असा असेल… ‘शुभ मंगल सावधान’ सिनेमाचा सिक्वल

नेहमीच आपल्या हटके अभिनयातून प्रेक्षकांना आपलंस बनून टाकणारा बॉलीवुड अभिनेता ‘आयुषमान खुराना’ पुन्हा एकदा असंच काहीसं हटके घेऊन येणार आहे. ‘शुभ मंगल सावधान’ या सिनेमाचा सिक्वल म्हणजेच, ‘शुभ मंगल- ज्यादा सावधान’ या सिनेमातून आयुष्मान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिनेमाची कथा ही ‘समलैंगिकता’ या विषयावर आधारित असून, आनंद एल. रॉय हे सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. सिनेमाबद्दल आयुषमने म्हटले आहे की, मी खूप वेळानंतर इतकी चांगली गोष्ट वाचली आहे, जी खूप संवेदनशीलता आहे. आणि समलैंगिकता विषयावर आधारित आहे. त्यामुळे ही कथा तुमच्या हृदयाला नक्की स्पर्श करेल. हा सिनेमा पुढील वर्षाच्या सुरवातीस रिलीज होणार आहे.

२०१७ मध्ये आलेल्या शुभमंगल सावधान या सिनेमात अभिनेत्री भूमि पेडणेकर आणि आयुष्मान यांची जोडी दिसून आली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.