बारामती: महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा विषय अनिवार्य होणार आहे मराठी बाबत सर्वांनी सकारात्मक होणे गरजेचे आहे. सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी विषय सक्तीचा करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. आपल्याच काही मुला-मुलींना मराठी लिहिता व वाचता येत नाही हे योग्य नाही. आपण महाराष्ट्रात राहतो प्रत्येकाला मराठी आपली मातृभाषा आली पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी व आमच्या सहकार्यांनी सकारात्मकता दाखविली आहे यासाठी सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी विषय सक्तीचा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले. ते बारामतीत आयोजित केलेल्या नागरी सत्कारादरम्यान बोलत होते.