शरद पवारांच्या परवानगीनेच सत्तास्थापन केली होती – फडणवीस

मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत सत्तास्थापनेबाबत मोठा खुलासा केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या परवानगीनेच अजित पवार यांनी सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याशी संपर्क केला होता, असे वक्तव्य फडणवीस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले कि, काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सरकार चालवणे शक्य नाही. भाजपासोबतच सरकार स्थापन केले पाहिजे, असं मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगितले आहे, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आम्हाला सांगितलं होतं. त्यामुळेच आम्ही त्यांच्यासोबत सत्तास्थापन केली, असे त्यांनी सांगितले. तसेच आम्ही राष्ट्रवादीकडे गेलोच नव्हतो. तर अजितदादाच आमच्याकडे आले होते, असा दावाही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे आता अजित पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना अजित पवार यांनी भाजपासोबत जात सरकार स्थापन केले होते. मात्र, अवघ्या ८० तासांमध्ये कोसळले.

Leave A Reply

Your email address will not be published.