माजी जलसंधारण मंत्र्यांनीच भ्रष्टाचार झाल्याचे दिले होते सूतोवाच

मुंबई – जलयुक्त शिवार योजनेवर कॅगने ताशेरे ओढल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने खुली चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही चौकशी एसआयटीमार्फत होणार आहे. राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे देवेंद्र फडणवीसांना राज्य सरकारने दिलेला आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयावर विरोधकांनी टीका केली आहे. तर  आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले  अजित पवार

”आम्ही विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं तेव्हा जलसंधारण खातं ज्यांच्याकडे होतं त्यानी तानाजी सावंत यांनी विधानपरिषेदत भ्रष्टाचार झाल्याचं सांगितलं होतं,त्यांनीच तसंच सूतोवाच केलं होतं.”

ते पुढे म्हणाले, ”कॅगच्या अहवाल दोन दिवसांच्या अधिवेशनात सादर करण्यात आला होता. हे जाणुनबुजून करत नाही. कॅगच्या अहवालावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. तशा पद्धतीच्या सूचना गेल्या आहेत”.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.