मुंबई – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून त्यामध्ये शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापन करावी, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली असल्याची माहिती समजते. मला मंत्रीपद नाही दिले तरी चालेल. पण भाजपसोबत युती करावी, असे त्यांनी म्हटले आहे. यावर मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावर चर्चा करू, तुम्ही पहिला मुंबईत या असा संदेश दिला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
फोनवरून चर्चा करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीसोबत कोणताही ताळमेळ नाही, आमदार आणि मंत्र्यांचीही तीच भूमिका आहे. पक्षाची विचारधारा ही हिंदुत्वाची आहे, त्यामुळे भाजपसोबत युती करणं हिच काळाची गरज आहे. आपण असं काय केले की ठाण्यामध्ये आपल्या विरोधात नाराजी पसरवली जाते आहे, असेही भावूक होऊन त्यांनी विचारले असल्याची माहिती समजते.
तसेच आपण कोणत्याही पक्षासोबत चर्चा केली नाही, कोणत्याही कागदावर सह्या केल्या नाहीत, असे एकनाथ शिंदे म्हणाले. यावर उद्धव ठाकरेंनी त्यांना मुंबईत या, चर्चा करु असा संदेश दिला आहे.