“तो’ तीन किमीचा परिसर प्रतिबंधित

बारामती : बारामती नगरपालिका हद्दीमध्ये करोना (कोविड-19) संक्रमित रुग्ण आढळल्यानंतर श्रीरामनगरसह तीन किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र तर पाच किमीचा परिसर बफरझोन म्हणून घोषित केलेला आहे. या परिसरात वाहनांना प्रवेश निषेध केला आहे. तसेच त्याठिकाणी 118 टीम मार्फत सर्वेक्षण सुरू केलेले आहे.

3600 घराची सर्वेक्षण पूर्ण झाले असून 14 हजार 571 लोकांचा सर्व्हे पूर्ण झालेला आहे. यामध्ये किरकोळ सर्दी, पडसे असणारे 65 व्य्क्ती आढळल्या आहेत. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.

श्रमिकनगर येथील संक्रमित रुग्णाच्या संपर्कातील जवळील व्यक्तींची “स्वब’ घेऊन टेस्टिंगसाठी नायडू हॉस्पिटल पाठवला आहे. त्याचा रिपोर्ट येणे बाकी असल्याचेही कांबळे यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रतिबंधित क्षेत्रांमधील नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये घराबाहेर पडू नये काही अडचण आल्यास मोबाइलद्वारे संपर्क साधावा. ज्या व्यक्ती बेघर आहेत व त्यांची जेवणाची सोय नाही त्यांची सोय सांस्कृतीक भवन व तांदुळवाडी जिल्हा परिषद शाळा येथे करण्यात आलेली आहे. अनेक दानशूर व्यक्ती व स्वयंसेवी संस्था अन्नदानासाठी पुढे येत आहेत, त्यासाठी तहसील व नगरपालिका कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन कांबळे यांनी केले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.