मोदींना खलनायक ठरवणे चुकीचे; काँग्रेस ला घरचा आहेर

नवी दिल्ली : काँग्रेस मधील दोन नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खलनायक ठरवणे अयोग्य असल्याचे वक्तव्य केल्याने काँग्रेसला चांगलाच घरचा आहेर मिळाला आहे. काँग्रेसच्या अभिषेक मनू सिंघवी यांनी मोदी समर्थनार्थ वक्तव केले आहे.

या आधी माजी केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांनी मोदींच्या कामाचे महत्त्व कमी करणे योग्य नाही. यातून काहीही साध्य होणार नसल्याचे वक्तव केले होते. एका कार्यक्रमात जयराम म्हणाले होते कि मोदींनी केलेल्या कामामुळेच ते सत्तेत परत आले आहेत. मोदी सरकार हे पूर्णपणे नकारात्मक नक्कीच नाही. ते सर्वसामान्यांच्या भाषेत बोलतात आणि त्यांनी मागील काळात जी कामे झाली नाहीत अशी कामे केल्याने जनता त्यांचं कौतुक करत आहे. एखाद्या व्यक्तीला समजून न घेता त्या व्यक्ती विरोधात लढणे कठीण असते. तसेच त्यांना खलनायक ठरवल्याने त्यांचा मुकाबला करणे अशक्य असल्याचे मत रमेश यांनी व्यक्त केले होते.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.