जीडीपीलाचा बायबल, रामायण आणि महाभारत मानणे चुकीचे

भाजप खासदार निशिकांत दुबे यांचा दावा

नवी दिल्ली : देशातील सध्याच्या आर्थिक परिस्थितीवरून विरोधी पक्षांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. त्यासाठी विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले असल्याचे पहायला मिळत आहे. जीडीपीत झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरु असलेल्या संसदेच्या अधिवेशनात मोठा गोंधळ सुरु आहे. याचदरम्यान झारखंडच्या गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी अजब दावा केला आहे. भविष्यात जीडीपीचा विशेष उपयोग नसल्याचे सांगत दुबे यांनी आज जीडीपीपेक्षा जास्त सातत्यपूर्ण विकास महत्त्वाचा आहे, असे म्हटले आहे.


वर्ष 1934 मध्ये जीडीपी लागू झाली. त्यापूर्वी जीडीपी नव्हते. फक्त जीडीपीलाचा बायबल, रामायण आणि महाभारत मानणे सत्य नाही असे यावेळी दुबे यांनी म्हटले. तसेच भविष्यातही जीडीपीचा जास्त काही उपयोग होणार नाही. सामान्य व्यक्तीचा आर्थिक विकास होत आहे किंवा नाही हाच आजचा नवा सिद्धांत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विकासात सातत्य आहे की नाही, हेच जीडीपीपेक्षा महत्त्वाचे असल्याचा दावादेखील त्यांनी यावेळी केला.

यापूर्वी कॉर्पोरेट टॅक्‍समध्ये कपातीबाबत बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या व्यापाराकडे पाहता चीनमधून कॉर्पोरेट आणि बहुराष्ट्रीय कंपन्या बाहेर पडण्याचे संकेत मिळेत आहे. त्यामुळे आम्ही त्वरीत कॉर्पोरेट टॅक्‍समध्ये कपात केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.