‘गुंडांचं आत्मबल वाढवणारं पालकत्व आमच्या बीडला मिळालं हे दुर्दैव’

मुंबई – परळी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण करण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला होता. मात्र, याप्रकरणावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर टीकास्त्र सोडले आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या कि, शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात परळी येथे व्यापारी आणि सामान्य जनतेवर अन्याय जनतेने केलेलं बंद ही परिस्थिती तर छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली. सर्वत्र खेद आणि तीव्र संताप व्यक्त होत आहे.

परळीत गुंडागर्दी, हफ्तेखोरी, माफिया राज करायचं आणि पोलिसांनी कर्तव्य बजावल्यावर, गुन्हे दाखल झाल्यावर मग ‘गय करणार नाही’ अशी भाषा करायची हे दुटप्पी धोरण. गुंडांचं आत्मबल वाढवणारं पालकत्व आमच्या बीडला मिळालं हे दुर्दैव..हे खपवून घेतलं जाणार नाही, अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी धनंजय मुंडेंवर केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.