मुंबई – मुंबई – शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापा टाकला असल्याची माहिती समोर येत आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाणा साधला आहे.
प्रताप सरनाईक यांच्या सुपुत्राला ईडीने घेतले ताब्यात
पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले,’केंद्रीय संस्थांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातोय. आम्ही कायम यावर आक्षेप घेतला आहे. भाजपचं सरकार जिथे आहे, तिथे छापेमारी झाल्याचे गेल्या सहा वर्षात दिसले नाही. ईडीसारख्या संस्थांचा राजकारणासाठी वापर केला जातोय हे दुर्दैवी आहे. ‘
ते पुढे म्हणाले, ‘भाजपचं ऑपरेशन कमळ यशस्वी होईल, असे वाटत नाही. ईडीच्या छापेमारीमुळे कोणावरही दबाव येणार नाही. उलट लोक पक्के होतील. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष एकत्र आहेत.’
शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचा छापा
दरम्यान,शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापा टाकला आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोहोचले आहे. यानंतर विहंग सरनाईक यांना ईडीने ताब्यात घेतले आहे.