मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण आता या प्रकरणी केतकीला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. शनिवारी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने तिला अटक केली आहे. यानंतर आज ठाणे न्यायालायने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजा आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले की, सोसल मीडियाचा वापर सर्वांनी सांभाळून करायला हवा. सोशल मीडियातून होणाऱ्या ट्रोलिंगचा सर्वांना त्रास होतो. केतकी चितळेची पोस्ट अत्यंत घाणेरड्या प्रकारची होती, असही सुजात यांनी म्हटलं. ते माध्यमांशी बोलत होते.
सुजात पुढं म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे तुम्ही कोणाच्या धोरणांवर, भूमिकेवर टीका करू शकता. कोणाच्याही दिसण्यावर टीका करणे चूक आहे. शरद पवार हे जगातील कॅन्सरग्रस्तांचे प्रेरणास्थान आहेत. महाराष्ट्रभर त्यांना सन्मान मिळतो. शरद पवार या वयात देखील इतक्या लोकांना भेटतात. मिडियाला सामोरे जातात. भाषणं करतात हे खरोखरच प्रेरणादायी असल्याचं मत सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केलं.