‘शरद पवारांसारखे ऊर्जावान नेतृत्व आम्हाला लाभलं, हे आमचं भाग्यच!’

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसची सातारा येथील सभा ही खऱ्या अर्थाने “पवार आणि पाऊस’ या दोघांमुळेच गाजली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार पावसातही सभा घेतली. पवार बोलायला उभे राहिले आणि तुफान पाऊस सुरु झाला. परंतु पवारांनी भर पावसातही सभा सुरुच ठेवली. यावर राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी असे ऊर्जावान नेतृत्व आम्हाला लाभलं, हे आमचं भाग्यच, असे म्हंटले आहे.

अजित पवार म्हणाले कि, मी म्हटलं होतं, ‘हवा बदलतेय’! याची प्रचिती आता सर्वांनाच आली. कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमध्येही आदरणीय साहेबांनी सातारकरांना संबोधित केलं.उसळलेल्या अलोट जनसागरानं तितक्याच आत्मीयतेनं साहेबांच्या हाकेला प्रतिसाद दिला.असलं ऊर्जावान नेतृत्व आम्हाला लाभलं, हे आमचं भाग्यच!, असे ट्विट त्यांनी केले.

दरम्यान, सातारा येथे पवारांनी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडली. कार्यकर्त्यांनी शिट्ट्या मारत व पावसात खुर्च्या डोक्‍यावर धरत जल्लोष केला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.