पाऊस नव्हे मतदारराजा बरसला!

नगर – जिल्ह्यातील बारा विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि.21)सायंकाळी सहा वाजेपर्यंत 64.73 टक्‍के मतदान झाले. गेली तीन दिवस सुरु असलेल्या पावसाचा परिणाम मतदानावर जाणवला नाही. त्यात आज पावसानेही काही अपवाद वगळता विश्रांती घेतल्याचे दिसले. मात्र गेल्या तीन दिवसापासून झालेल्या पावसामुळे सर्वत्र चिखल व दलदल झाल्याने मतदारांसह कार्यकर्ते, मतदान कर्मचारी यांनाही कसरत करावी लागली.
सकाळी 7 वाजता मतदानाला प्रारंभ झाला.

पहिल्या दोन तासात म्हणजेच सकाळी 9 पर्यंत बारा मतदारसंघात केवळ 5.64 टक्‍के मतदान झाले. त्यानंतर सकाळी 11 पर्यंत हा आकडा 18.01 टक्‍क्‍यावर गेला. दुपारी 1 वाजता तो 33.73 तर तीन वाजता हा आकडा 40.20 टक्‍के म्हणजेच 50 टक्‍क्‍यापर्यंत गेला. त्यानंतर दुपारी 5 वाजता जिल्ह्यातील एकूण मतांची टक्‍केवारी 62.86 टक्‍के झाली होती. सहा वाजता मतदान संपले. त्याचा अधिकृत आकडा 64.73 टक्‍के इतका आहे. पण सहाला मतदान संपले असले तरी अनेक मतदारसंघात सायंकाळी सात-आठ वाजेपर्यंत मतदानासाठी रांगा लागलेल्या होत्या. सकाळच्या टप्प्यात मतदानाला जास्त प्रतिसाद दिसला नाही.मात्र दुपारनंतर हा आकडा वाढत गेला. उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची मतदान घडवून आणताना चांगलीच दमछाक झालेली दिसत होती.

जिल्ह्यात सर्वात जास्त मतदान नेवासा मतदारसंघात 72.64 टक्‍के झाले तर सर्वात कमी मतदान नगर शहरात 48.53 टक्‍के झाले. नेवासा पाठोपाठ कर्जत-जामखेडमध्ये 71.29 टक्‍के,कोपरगावमध्ये 69.40,संगमनेरमध्ये 69.20 तर अकोले मतदारसंघात 67.73 टक्‍के मतदान झाले. दिव्यांग,अपंग,तृतीयपंथीय मतदारांनीही मतदानाचा हक्‍क बजावला. महिला कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती असलेले सखी मतदार केंद्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

सकाळी 9 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी
अकोले : 6.05, संगमनेर : 6.91, शिर्डी : 5.89, कोपरगाव : 4.67, श्रीरामपुर : 3.83, नेवासा : 7.58, शेवगाव-पाथर्डी : 5.93, राहुरी : 5.03, पारनेर : 6.99, 10) नगर शहर : 4.68, श्रीगोंदा : 3.64, कर्जत-जामखेड : 6.65, एकूण : 5.64 टक्‍के

सकाळी 11 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी
अकोले : 19.22, संगमनेर : 20.38, शिर्डी : 17.26, 4) कोपरगाव : 15.82, श्रीरामपुर : 13.13, नेवासा : 21.86, शेवगाव-पाथर्डी : 18.92, राहुरी : 15.86, पारनेर : 20.94, नगर शहर : 14.55, श्रीगोंदा : 17.18, कर्जत-जामखेड : 20.74, एकूण : 18.01 टक्‍के

दुपारी 1 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी
अकोले : 37.14, संगमनेर : 36.09, शिर्डी : 31.94, कोपरगाव : 32.35, श्रीरामपुर : 25.29, नेवासा : 39.40, शेवगाव-पाथर्डी : 35.35, राहुरी : 30.15, पारनेर : 38.11, नगर शहर : 27.49, श्रीगोंदा : 32.81, कर्जत-जामखेड : 38.45, एकूण : 33.73 टक्‍के

दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी
अकोले : 52.73, संगमनेर : 51.47, शिर्डी : 41.39, कोपरगाव : 49.96, श्रीरामपुर : 39.99, नेवासा : 55.81, शेवगाव-पाथर्डी : 50.09, राहुरी : 45.31, पारनेर : 52.92, नगर शहर : 39.53, श्रीगोंदा : 48.30, कर्जत-जामखेड : 54.99, एकूण-49.20 टक्‍के

दुपारी 5 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी
अकोले : 64.24, संगमनेर : 65.61, शिर्डी : 63.92, कोपरगाव : 67.15, श्रीरामपुर : 56.25, नेवासा : 70.40, शेवगाव-पाथर्डी : 61.88, राहुरी : 60.17, पारनेर : 63.39, नगर शहर : 52.69, श्रीगोंदा : 61.12, कर्जत-जामखेड : 68.64, एकूण-62.86 टक्‍के

Leave A Reply

Your email address will not be published.