वाल्हे – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंके ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बॅंक आहे. एका विचाराची लोक एकत्र आले आणि निवडून आलेले आहेत. आता बॅंका चालवणे अवघड झालेले आहे, अनेक नियमावली येत असतात. पारदर्शक काम करा, कागदपत्रांची पूर्तता आणि धोरणात बसत असेल तर त्यांना मदत करा; सहकार कायद्यात आता केंद्र सरकारकडून बदल होत आहेत
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी कृषीमंत्री शरद पवार यांची बारामतीमधील गोविंद बागेतील निवासस्थानी बुधवारी (दि. 19) भेट घेतली. यावेळी पवार यांनी मोलाचा सल्ला दिला. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेस वर्चस्व राखत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडी शनिवारी (दि. 15) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्या.
यावेळी पुरंदरचे सर्वसामान्य कुटुंबातील प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी बॅंकेचे अध्यक्षपदाची संधी मिळाली. शरद पवार म्हणाले, . उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या सल्ल्याने पुणे जिल्हा बॅंक अजून पुढे घेऊन जावा. आपली बॅंक अजून अग्रगण्य कशी होईल,
यासाठी प्रयत्न करण्याचा सल्लाही यावेळी प्रा. दुर्गाडे यांना शरद पवारांनी दिला. यावेळी प्रा. डॉ.दिगंबर दुर्गाडे यांचा सन्मान शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. यावेळी पिसुर्टीचे माजी सरपंच अशोक बरकडे, पुरंदर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संदेश पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.