चोरटे काय चोरतील याचा नेम नाही

पुणे – चोरटे काय चोरतील याचा कधीच पत्ता लागत नाही. सध्या शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवरील गटारांची झाकणे चोरून नेण्याचा प्रकार सुरू झाला आहे. आज सुद्धा बाजीराव रस्त्यावरील बीएसएनएल कार्यालयासमोरील दोन झाकणे चोरून नेली आहेत.

पालिकेच्या वतीने शहरातील विविध रस्त्यांवर बसविण्यात येणारी पावसाळी गटारे असतील किंवा सांडपाण्याची गटारे असतील त्यांना वरून झाकणे बसविली जातात. अनेक वेळाही झाकणे सिमेंटची असतात पण वाहनांची सतत जा-ये होत असल्याने ही काही ठिकाणी लोखंडी झाकणे बसविण्यात येतात. ही लोखंडी झाकणे भंगारात विकली तरी त्यांचे चांगले पैसे मिळतात. एक लोखंडी झाकण साधारणतः पंधरा ते वीस किलो इतके वजनाचे असते, किलोला दोनशे रुपये भाव आहे. त्यामुळे एक झाकण जरी चोरले तरी दिवसाला दोन ते तीन हजार रुपये मिळतात. आज बाजीराव रस्त्यावरील प्रकार उघडकीस आला असला तरी गेल्या आठवड्यात लोकमान्य नगरमधील रस्त्यावरील सात ते आठ झाकणे एका रात्रीतून पळवून नेली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.