Sharad Pawar – जगात कुठेही आज निवडणूकीसाठी ईव्हीएमचा वापर होत नाही. मग भारताच याचा वापर का सुरू आहे. निवडणूक पद्धतीत बदल करणे गरजेच आहे. आज तुमच्या गावाने एका वेगळ्या पद्धतीने जायचे ठरवले तर सरकाने तुमच्याविरोधात खटला भरला. माझी तुम्हाला विनंती आहे की, तुमच्यावर दाखल करण्यात आलेल्या खटल्याची सर्व माहिती मला द्या. याबाबतची तक्रार आम्ही राज्याचा निवडणूक आयोग, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे देऊ. हे कशासाठी? तर निवडणूक यंत्रणांचा काळा सोकू नये, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हल्लाबोल केला.
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर आक्षेप घेत राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. अशातच सोलापूरमधील माळशिरसमधील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, याला प्रशासनाकडून विरोध करण्यात आला. या घटनेनंतर शरद पवार यांनी रविवारी मारकडवाडीला भेट दिले.
शरद पवार म्हणाले, देशात सध्या मारकडवाडी गावाची चर्चा सुरू आहे. ईव्हीएम मतदानातील आकडेवारी ग्रामस्थांचा आक्षेप आहे. गावकऱ्यांना त्यांच्या गावात जमावबंदी लागू केली आहे. काही जणांकडून निकालांवर संशय व्यक्त केला जात आहे. अमेरिकेत बॅलट पेपवर मतदान होते. आपल्याकडे का नाही? मारकडवाडीने बदल करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
येथे आम्हाला राजकारण आणायचे नाही. येथील लोकांच्या मनातील शंकानिरसन दूर करायचे आहे. निवडणूक आयोगाबाबत संशय दूर करायचा आहे. ग्रामस्थांनी बॅलट मतदानासाठी ठराव करावा, हा ठराव राज्य सरकारला पाठवावा. मुख्यमंत्र्यांनी मारकटवाडीत येऊन लोकांच्या शंकेचे निरसन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
ही चळवळ सुरू ठेवून गरजेचे आहे. त्याच पद्धतीने न्यायालयीन लढा ही देणे आवश्यक आहे. लढा देण्यासाठी मी तुमच्याबरोबर आहे. मतदारसंघातील संपूर्ण तालुक्यातून ईव्हीएम हटाव, पुढील निवडणुका या बॅलेट पेपरवरती घेण्यात यावे अशा पद्धतीचे ठराव करून ते ठराव आमदार जानकर यांच्याकडे द्यावेत. या आंदोलनाविषयी मी संसदेमध्येही आवाज उठवणार आहे, अशी ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली. तसेच या आंदोलनाविषयी पंतप्रधान आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांच्याबरोबर ही चर्चा करणार असल्याचेही सांगितले.