राज ठाकरेंवरील कारवाईकडे राजकीय दृष्टीने पाहणे अयोग्य

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले ईडच्या कारवाईचे समर्थन

नवी दिल्ली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनुर प्रकरणी ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, ही कारवाई राजकीय हेतूने केल्याचा मनसेने आरोप केला आहे. तर शिवसेनेकडून ईडीच्या कारवाईचे समर्थन केले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना आपण याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच ईडीच्या कारवाईकडे राजकिय दृष्टीने पाहणे अयोग्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

ईडी, सीबीआय, आयकर विभाग आपापल्या पद्धतीने काम करत असतात असे सांगत उद्या जर नरेंद्र मोदींवर आरोप झाले तर त्यांचीही चौकशी झाली पाहिजे असं सांगत संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईचं समर्थन केलं आहे.अनेक राजकारणी उद्योग क्षेत्रात आहेत. हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. मात्र कारवाईकडे राजकीय दृष्टीने पाहणे आणि बोलणे अयोग्य आहे. जर उद्या मी काही चुकीचे केल नसेल तर सिद्ध करु शकतो. पुराव्याला देशात अजूनही स्थान असून लोकशाही जिवंत आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×