महिलांच्या कर्तृत्वाची शान सांभाळणे आणि ती जपणं हाच पुरुषार्थ – गीतांजली शिर्के

पुणे : स्त्रियांमधील कलागुण कौशल्य ओळखणे त्याला साथ देणे त्याला वाढवणे याबरोबरच त्यांच्यामधील कर्तृत्वाची शान सांभाळून ती जपणे हाच पुरुषार्थ आहे,असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी गीतांजली शिर्के यांनी केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या.

आंबेगाव येथील अभिनवच्या संकुलामध्ये महिलांच्या हक्क आणि अधिकारासाठी लढण्यासाठी समविचारी महिलांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ” कर्तव्यनिष्ठ महिला मंचाचा” छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त पौर्णिमा तावरे तहसीलदार अर्चना निकम,संस्थापक राजीव जगताप,उपाध्यक्ष संजीव जगताप,सेक्रेटरी सुनीता जगताप, सहसेक्रेटरी दीपिका जगतापआणि निर्मोही जगताप, खजिनदार ध्रुव जगताप, संस्थेचे सर्व मान्यवर सदस्य, दिलीप जगताप, डॉ. सविता शिंदे, अभिनव स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वर्षा शर्मा, संस्थेच्या सर्व विभागाचे प्राचार्य, शिक्षक त्याचबरोबर शाळेच्या माजी विद्यार्थिनी मिसेस इंडिया नीलम टाटीया पवार, आयुर्वेद वैद्य डॉ. नम्रता नेवसे,डॉ. क्रांती जगताप, दीपिका जगताप, सायली जगताप, कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे उपस्थित होते. हा कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरा करण्यात आला.

पोलिस उपायुक्त पौर्णिमा तावरे म्हणाल्या की,”तुम्ही एक स्त्री आहे म्हणून मागे पडू नका.तुमच्यातील बळ आणि जी क्षमता आहे त्याच्या जोरावर तुम्ही तुमच्या कुटुंबाला खंबीर पाठबळ द्या.”राजीव जगताप म्हणाले की,”स्त्री आणि पुरुष यांना समान मानले तर स्त्रियांचे आरक्षण ३३ टक्क्यावरून ५० टक्के होण्यासाठी झटले पाहिजे. अभिनवच्या वडवडी, भोर येथील डिप्लोमा इंजिनियरिंग कॉलेजमध्ये पंचक्रोशीतील मुलींना मोफत वसतिगृह आणि शिक्षण देऊन मी महिलांसाठी उन्नतीसाठी खारीचा वाटा उचलत आहे. त्याचा मला अभिमान आहे. “यावेळी माजी विद्यार्थिनींनी शाळेने दिलेल्या संस्कार, शिस्त, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आम्हाला आमच्या जीवनामध्ये किती उपयोगी पडले यासाठी शाळेचे खूप आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती साळवी आणि सोनम गुप्ता या शिक्षकांनी केले तर आभार दीपा देशपांडे यांनी मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.