दाढी वाढवलेल्या अजय देवगणला ओळखणे मुश्‍कील

मुंबई – अजय देवगण त्याच्या स्टायलिस्ट लूकमुळे गेल्या दोन दशकांपासून खूप चर्चेत असतो. मात्र, अलीकडे करोना लॉकडाऊनच्या काळात त्याचा लूक एवढा बदलला आहे, की त्याला ओळखणेही कठीण झाले आहे. 

त्याचा हा बदललेला लूकमधील फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये पिकलेल्या लांब दाढीमिशांमधील त्याच्या फोटोवर त्याच्या फॅन्सनी खूप कॉमेंट केल्या आहेत. अजयने आतापर्यंत मिशा वाढवल्या होत्या मात्र दाढी कधीही वाढवलेली नव्हती.

त्यामुळे या दाढीवाल्या लूकमध्ये त्याला ओळखताही येत नाही. या दाढीवाल्या लूकमध्ये अजयला बघितल्यावर अजयच्या फॅन्सना वेगळीच शंका यायला लागली होती. तो आजारी असल्याचे अनेकांना वाटले.

पण तो पूर्णपणे स्वस्थ आहे आणि ही वाढवलेली दाढी म्हणजे लॉकडाऊनचा परिणाम आहे, हे मुद्दाम स्पष्ट केले पाहिजे. अजयने हा लूक त्याच्या आगामी “थॅंक गॉड’साठी राखून ठेवला आहे. अजय त्याच्या भूमिकेवर नेहमीच खूप कष्ट घेत असतो.

त्यामुळेच त्याच्या लूकबाबतही त्याने कसोशीने दाढी वाढवण्याचे ठरवले आहे. अलीकडेच अजयचा “टोटल धमाल’ रिलीज झाला होता आणि त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाददेखील मिळाला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.