Elon Musk | टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एलॉन मस्क यांनी शनिवारी, 19 एप्रिल 2025 रोजी ‘एक्स’ वर मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर त्यांनी ‘मी भारतात येण्याची आतुरतेने वाट पाहत म्हणत पोस्ट शेअर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (18 एप्रिल 2025) सांगितले की, त्यांनी अलिकडेच एलॉन मस्क यांच्याशी फोनवरून चर्चा केली, ज्यामध्ये दोघांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’ वर लिहिले, “आम्ही तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील सहकार्याच्या प्रचंड संभावनांवर विचार केला. भारत या क्षेत्रांत अमेरिकेसोबत आपली भागीदारी पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे.”
एलॉन मस्क भारतात येण्यास उत्सुक
पोस्टमध्ये एलॉन मस्क यांनी लिहिले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान होता. या वर्षाच्या अखेरीस मी भारतात येण्यास उत्सुक आहे.” दरम्यान, फेब्रुवारी 2025 मध्ये पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. या काळात त्यांची एलॉन मस्क यांची भेट घेतली होती.
It was an honor to speak with PM Modi.
I am looking forward to visiting India later this year! https://t.co/TYUp6w5Gys
— Elon Musk (@elonmusk) April 19, 2025
फेब्रुवारीत पंतप्रधान मोदी आणि मस्क यांची भेट
फेब्रुवारी 2025 मध्ये पंतप्रधान मोदी दोन दिवसीय अमेरिका दौर्यावर गेले होते. या दौर्यात त्यांनी एलॉन मस्क यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींची मस्क यांच्याशी भेट ही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापूर्वी झाली होती, ज्याची प्रसारमाध्यमांमध्ये खूप चर्चा झाली.
अमेरिका-चीन तणावादरम्यान भारताशी व्यापारी संवाद
पंतप्रधान मोदी आणि मस्क यांचा हा फोन कॉल अशा वेळी झाला आहे, जेव्हा अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारी तणाव टोकाला पोहोचला आहे. अमेरिकेच्या शुल्कामुळे (टॅरिफ) चीन प्रभावित झाला आहे आणि तो भारताशी आपले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत भारत-अमेरिका सहकार्यावर चर्चा करणे महत्त्वाचे ठरले आहे. Elon Musk |
भारतातील गुंतवणुकीच्या नव्या संधी
एलॉन मस्क यांचा भारत दौरा केवळ एक सामान्य भेट नसून, त्यांच्या दोन प्रमुख कंपन्या टेस्ला आणि स्टारलिंक यांच्यासाठी मोठ्या व्यावसायिक संधी घेऊन येऊ शकतो. टेस्ला कंपनीने भारतात आपले स्थान निर्माण करण्याची तयारी सुरू केली आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनीने मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 4000 चौरस फूट जागा भाड्याने घेतली आहे. याशिवाय, दिल्ली आणि मुंबईतील इतर ठिकाणीही कंपनीची सक्रियता दिसून येत आहे. Elon Musk |
हेही वाचा:
Pravin Darekar : ठाकरे बंधूंना आता एकमेकांची राजकीय गरज; प्रवीण दरेकरांचा जोरदार टोला