पुणे – शाळा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक शिक्षक व कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी बंधनकारक, शाळेतील कार्यक्रम आयोजनावर निर्बंध, विद्यार्थ्यांची उपस्थिती बंधनकारक नाही, उपस्थितीसाठी पालकांची संमती आवश्यक, एका बाकावर एकच विद्यार्थी, सर्वांना मास्क अनिवार्य अन् थर्मल स्क्रिनिंग अशा मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण विभागाने जारी केल्या. प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यानंतर सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन सर्वांना करावे लागणार आहे.
राज्य शासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंत वर्ग दि. 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे शाळा कशा पद्धतीने भरवावेत, असा प्रश्न शाळांपुढे होता. आता शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू होण्यापूर्वी आणि सुरू झाल्यानंतरच्या मार्गदर्शक सूचना जारी केले आहेत. त्याप्रमाणे सर्व संस्थांना नियोजन करणे आवश्यक आहे.
…………………….
शाळा सुरू करण्यापूर्वी
* शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण
* शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे
* जंतुनाशक, साबण, पाणी आदी वस्तूंची उपलब्धता
* शाळा वाहतूक सुविधांचे निजर्तुंकीकरण सुनिश्चित करावे
* क्वारंटाइन सेंटर असल्यास ते इतर ठिकाणी स्थानापन्न करावे
………..
* सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी बंधनकारक
* प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक
* प्रमाणपत्राची शाळा व्यवस्थापनाने पडताळणी करावी
* पॉझिटिव्ह असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच उपस्थिती
* लक्षणे असल्यास त्वरित चाचणी करणे आवश्यक
…………….
बैठक व्यवस्था व पोस्टर्स
* वर्गातील बैठकव्यवस्थेत शारीरिक अंतर असावे
* वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी
* शाळेत दर्शनी भागावर मास्कचा वापर संदर्भात पोस्टर्स
* थुंकण्यावरील बंदीची काटेकोटर अंमलबजावणी
* रांगेत उभे राहण्यासाठी सहा फूट अंतर
………………
पालकांची संमती आवश्यक
* शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची लेखी संमती आवश्यक
* आजारी मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये
* पालकांच्या संमतीने घरी राहून अभ्यास करण्यासाठी योजना राबवावी
* शाळेतील उपस्थिती बंधनकारक नाही
* वयोवृद्ध, दिव्यांग कर्मचारी, गरोदर महिला कर्मचारी, औषधोपचार घेत आहेत, त्यांनी शक्यतो विद्यार्थ्यांच्या संपर्कात येऊ नये
…………………………
शाळा सुरू झाल्यानंतरची मार्गदर्शक सूचना
* शाळेचा परिसर दररोज स्वच्छ ठेवणे आवश्यक
* वर्गखोल्या निर्जंतुकीकरण करण्यात यावे
* सर्व कचरा विल्हेवाट लावण्यात यावी
* स्वच्छतागृहाचे वारंवार निर्जंतुकीकरण
* स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता
* स्वच्छतेमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊ नये
…………………….
शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवणे
* मास्क वापर करावा. विद्यार्थी मास्क अदलाबदल करणार नाही, याची दक्षता घ्यावी
* विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी दररोज थर्मल स्क्रिनिंग घेण्यात यावी
* शाळेच्या आवारात अन्य व्यक्तींना प्रवेश देऊ नये
* विद्यार्थी सूचनांचे पालन करीत नसल्यास पालकांना सांगावे
…………….
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची सोय करणे
* संसर्ग टाळण्यासाठी पालकांनी स्वत: वाहनाने मुलास शाळेत सोडावे
* शाळा वाहतुकीच्या वाहनाचे दिवसातून दोन वेळा निर्जंतुकीकरण आवश्यक
* वाहनचालकांनी विद्यार्थ्यांशी शारीरिक अंतराचे पालन करावे
* बस-कारच्या खिडक्यांना पडदे नसावेत, खिडक्या उघड्या ठेवाव्यात
* वाहनात हॅन्ड सॅनिटायझर ठेवण्यात यावेत
…………..
4. सुरक्षित प्रवेश
* विद्यार्थ्यांनी शाळेत वेळेत उपस्थित राहावे
* वेळापत्रक निश्चित करावेत
* विविध इयत्तांचे वर्ग सुरू होण्यापूर्वी व संपण्यापूर्वी 10 मिनिटांचे अंतर असावे
* चारपेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र जमणार नाहीत, याची शाळेची जबाबदारी
* वाहनांची गर्दी टाळण्यासाठी स्वयंसेवकांची मदत घ्यावी
* एकापेक्षा अधिक प्रवेशद्वाराचा वापर करावा
* आजारी कर्मचाऱ्यास रजेवर राहण्याची मुभा
* शेजारी आजारी असल्यास मुलांना शाळेत पाठवू नये
……………..
वर्गखोल्या…
* विद्यार्थ्यांनी साहित्याची अदलाबदल करू नये
* ऑनलाइन गृहपाठाची व्यवस्था करावी
* बंद खोल्यामध्ये वर्ग भरवण्यात येऊ नये
* स्वच्छतागृहामध्ये अधिक गर्दी होता कामा नये
……………
* अभ्यास वर्गाची व्यवस्था
* गर्दी टाळण्यासाठी एक दिवसाआड विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे
* एकाच दिवशी 50 टक्के उपस्थिती वर्गात, अन्य ऑनलाइन वर्गात
* ऑनलाइन व ऑफलाइन वर्गाचे वेळापत्रक तयार करावे
* प्रत्येक वर्गाचा कालावधी 3 ते 4 तासांपेक्षा अधिक असू नये
* प्रत्येक वर्गासाठी जेवणाची सुट्टी नसेल.
* संशयित आढल्यास एका खोलीत इतरांपासून वेगळे ठेवावे