मुंबई – मराठी अभिनेत्री ‘प्राजक्ता माळी’विरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. प्राजक्ताला वारंवार नोटीस बजावूनदेखील कोर्टात हजर न राहिल्याने एक हजार रुपयांचा दंड आकारत ठाणे कोर्टाने जामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे.
फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा हिला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप प्राजक्तावर आहे. त्यामुळे प्राजक्ताविरुद्ध मनचंदा हिने ५ एप्रिल रोजी ठाणे ग्रामीणच्या काशिमिरा पोलिस ठाण्यात तक्रार केली होती.
एका फॅशन शोदरम्यान दिलेले कपडे योग्य नसल्याच्या कारणावरून शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा हिने केला आहे. या प्रकरणाशी संबंधित प्राजक्ता आणि जान्हवी यांच्या संभाषणाचा व्हॉट्स अॅप स्क्रीनशॉटही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यामुळे हे प्रकरण सिनेसृष्टीत चांगलेच रंगले होते.
दरम्यान, या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं प्राजक्ताने स्पष्ट केलं होतं. जान्हवीनं केलेल्या आरोपांनुसार पोलीसांनी प्राजक्ता माळी विरोधात कलम ३२३ आणि ४०४ अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.