ISSF World Cup Final 2024 (Sonam Maskar) : भारतीय नेमबाज सोनम मस्करने ISSF विश्वचषक फायनलच्या पहिल्या दिवशी मंगळवारी रौप्य पदकासह भारताचे खाते उघडले. इतर भारतीय नेमबाजांनी मात्र निराशा केली. कोल्हापूरची नेमबाज सोनमने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल अंतिम स्पर्धेत 252.9 गुणांसह दुसरे स्थान मिळवताना रौप्यपदक पटकावले.
SONAM WINS SILVER AT WORLD CUP FINAL 🥈
Sonam Maskar wins Silver Medal with brilliant score of 252.9, at the ISSF World Cup Final, New Delhi
WELL DONE SONAM 🇮🇳👏 pic.twitter.com/ZXDMeFfBdv
— The Khel India (@TheKhelIndia) October 15, 2024
चीनच्या ऑलिम्पिक चॅम्पियन हुआंग युटिंगने सुवर्णपदक जिंकले. तीने 254.3 गुण मिळवताना विश्वविक्रम नोंदवला. तर फ्रान्सच्या ओशन मुलर हिने 231.1 गुणांसह कांस्यपदक जिंकले. सोनमने पात्रता फेरीत 632.1 गुणांसह चौथे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
भारताची तिलोत्तमा सेन (167.7 गुण) आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत सहाव्या स्थानावर राहिली. 22 वर्षीय सोनमने दोन वर्षांपूर्वी स्पर्धात्मक नेमबाजी सुरू केली आणि गेल्या वर्षी तिला राष्ट्रीय संघात स्थान मिळाले होते. सोनमच्या कारकिर्दीतील हे सर्वात मोठे पदक आहे.
दरम्यान,पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या नेमबाजांना थेट स्पर्धेसाठी पात्रता मिळाली होती, परंतु भारताच्या मनू भाकर, सरबज्योत सिंग आणि स्विनिल कुसळे यांनी ISFF विश्वचषक 2024 मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता.