बंगलुरू – अंतरिक्ष संशोधन क्षेत्रातील सहकार्याबाबत इस्त्रो या भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेची इस्त्रायल आणि युरोपिय देशांतील अंतरीक्ष संशोधन संस्थांशी चर्चा सुरू आहे. भारताच्या अंतरिक्ष विभागाचे सचिव व इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी या संबंधात नुकतीच इस्त्रायलच्या अंतरिक्ष संस्थेचे महासंचालक ऍवी ब्लासबर्गर आणि युरोपिय स्पेस एजन्सीचे प्रमुख जोसेफ अश्चबचर यांच्याशी ऑनलाईन चर्चा केली.
यावेळी छोट्या उपग्रहांसाठीची इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टीम, जिओ व लिओ ऑप्टिकल लिंक इत्यादी तांत्रिक विषयावर चर्चा झाली. भविष्य काळात परस्परांच्या सहकार्याने अंतरिक्ष मोहीमा राबवण्याच्या संबंधातही त्यांच्याच चर्चा झाली असेही सांगण्यात आले आहे. भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेने अन्य देशांच्या सहकार्याने नजिकच्या भविष्यकाळात अनेक महत्त्वाच्या अंतरिक्ष मोहिमा प्रस्तावित केल्या आहेत.