शुक्रावरील मोहिमांसाठी इस्रो सरसावली

अन्य अंतराळ संशोधन संस्थाही जीवसृष्टीच्या शक्‍यतेने वाटचालीच्या तयारीत 

पुणे – शुक्र ग्रहावर जीवसृष्टी असल्याच्या शक्‍यतेने इस्रोकडून 2023 मध्ये शुक्रायन 2023 ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यात शुक्रावरील वातावरणाचा रासायनिक अभ्यास केला जाणार आहे. त्यामुळे प्रगत राष्ट्रांच्या जोडीने भारतही या मोहिमेत उतरणार आहे.

शुक्र ग्रहावर जीवसृष्टीच्या संभावनेचे संकेत मिळल्याचे वृत्त अलीकडेच विविध वृत्तसंस्थांनी प्रकाशित केले आहे. मात्र, वैज्ञानिक जगतात गेल्या अनेक वर्षांपासून शुक्रावरील जीवसृष्टीच्या शोधाबाबत चढाओढ सुरू आहे. भारताच्या इस्रोसहित अनेक अंतराळ संशोधन संस्थांनी शुक्राकडे वाटचाल करण्याची तयारी केली असून, लवकरच शुक्रावरील जीवसृष्टीबाबत आढावा घेणाऱ्या अनेक अंतराळ मोहिमा आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा’च्या संशोधकांनी नुकतेच आतापर्यंतचे सर्वात महत्त्वाचे संशोधन, असा दावा करत शुक्र ग्रहावर जीवसृष्टीसाठी अनुकूल वातावरणाबाबत संकेत मिळाल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता शुक्राकडे झेप घेण्याचे वेध अनेक अंतराळ संशोधन संस्थांना लागले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था “इस्रो’चाही समावेश आहे. नुकतेच इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी इस्रोतर्फे लवकरच “शुक्रायन-1′ ही अंतराळ मोहीम प्रस्तावित असून, 2023 अथवा त्यानंतरच्या काळात ही अंतराळ मोहीम आयोजित केली जाणार आहे. यामध्ये शुक्रावरील वातावरणाचा रासायनिक अभ्यास केला जाणार असल्याचे सांगितले.

नासाकडूनही शुक्रावरील अंतराळ मोहिमेसाठी विविध प्रस्तावांचा अभ्यास केला जात आहे. तर काही खासगी कंपन्यांही या मोहिमेबाबत उत्सुक आहेत. न्यूझीलंडमधील एका खासगी अंतराळ संशोधन संस्थेतर्फेही शुक्रावर एक छोटी मोहीम राबविण्याची तयारी केली जात आहे. तर अमेरिकेच्या विसी या संस्थेतर्फेही यासंदर्भातील प्रस्ताव करण्यात आला आहे. तर दाव्हिन्सि प्लस आणि वेरिटास या दोन अंतराळ संशोधन कंपन्यांमध्येही अंतराळ संशोधनाबाबत चुरस निर्माण झाली आहे.

शुक्र ग्रहावर पोहोचण्यासाठी आपल्याला लहान मोहिमा आयोजित करण्याची गरज असल्याचे आपण लक्षात घेतले पाहिजे.
– थॉमस झुर्बुचेन, नासा’च्या सायन्स मिशन डायरक्‍टरेटचे प्रमुख

Leave A Reply

Your email address will not be published.