इस्रोने लॉन्च केले PSLV 53 वे मिशन;यंदाची पहिली अंतराळ मोहीम

बंगळुरु : इस्रोने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यावर्षीची यंदाची पहिली अंतराळ मोहीम लॉन्च केली आहे. PSLV द्वारे सकाळी 10 वाजून 24 मिनिटांनी 19 उपग्रहांचे अंतराळात प्रक्षेपण झाले. PSLV-C51 हे PSLV चे 53 वे मिशन आहे. या माध्यमातून ब्राझीलचा अ‍ॅमेझोनिया – 1उपग्रहही अंतराळात पाठवला जाणार आहे. अ‍ॅमेझोनिया-1 प्रायमरी सॅटलाईट आहे. तसेच अन्य 18 उपग्रह देखील प्रक्षेपित करण्यात आले आहे. त्यापैकी किडझ इंडियाने एक उपग्रह तयार केला आहे.

ISRO नं म्हटलं आहे की, अमेझोनिया -1 च्या मदतीने अमेझॉन क्षेत्रातील वनांची कत्तल आणि ब्राझीलमधील कृषी क्षेत्राशी संबंधित वेगवेगळ्या विश्लेषणांसाठी यूझर्संना रिमोट सेंसिंग डेटा प्रदान करण्यास मदत होईल तसेच वर्तमान संरचना आणखी मजबूत बनू शकेल. 18 अन्य सॅटेलाइट्समधील चार इन-स्पेस मधून आहे. यापैकी तीन सॅटेलाइट्स भारतातील शैक्षणिक संस्थानांच्या यूनिटीसॅट्समधील आहेत.

यात श्रीपेरंबदुर स्थित जेप्पीआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूरमधील जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि कोईंबतूरमधील श्री शक्ति इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नोलॉजी या संस्थांचा समावेश आहे. अन्य एकाची निर्मिती सतीश धवन सॅटेलाइट स्पेस किड्ज इंडियानं केली आहे तर बाकी 14 एनएसआयएलची निर्मिती आहे.

या वर्षातील भारतातील हे पहिले अवकाश अभियान PSLV साठी बरंच मोठे असणार आहे. कारण याच्या उड्डाणाची वेळमर्यादा एक तास 55 मिनिटं आणि 7 सेकंदांपर्यंत असणार आहे. आता भारताने प्रक्षेपित केलेल्या एकूण परदेशी उपग्रहांची संख्या वाढून 342 झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.