संपर्क साधण्यासाठी इस्रोचे शर्तीचे प्रयत्न चालूच

नवी दिल्ली –  भारतीय अवकाश संशोधन संघटना (इस्रो) ने अद्याप आशा सोडलेली नाही. इस्रो सध्या ‘हार्ड लँडिंग’ नंतर चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या ‘चंद्रयान -२’ लँडर ‘विक्रम’शी संपर्क साधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. शनिवारी, चंद्रच्या पृष्ठभागापासून 2.1 किलोमीटरवर असताना ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्याचा प्रयत्नात शेवटच्या क्षणी विक्रमचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला.

दरम्यान, यासंदर्भात आज इस्रोने आपल्या अधिकृत ट्विटवर अकाउंटद्वारे ट्विट करत माहिती दिली आहे कि,’विक्रम लॅंडरशी संपर्क तुटल्यानंतर अद्यापही कोणताही संपर्क झालेला नाही. लॅंडरशी संपर्क करण्यासाठी सर्व शक्य प्रयत्न केले जात आहे.’ असं इस्रोने अधिकृतरित्या म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.