नासाला ‘विक्रमचा’ ठावठिकाणा नाही सापडला, ऑक्टोबरमध्ये पुन्हा करणार प्रयत्न

नवी दिल्ली – भारतीय अवकाश संस्था इस्त्रोच्या चांद्रयान 2 मोहिमेतील विक्रम लॅंडरला शोधण्यात अमेरिकेची अतंराळ संस्था नासाला अपयश आले आहे.नासाने ट्विट करत ही माहिती दिली आहे, “नासाने ट्विटमध्ये म्हटले आहे की आम्ही विक्रम लॅंडरला आता जरी सापडू शकलो नसलो तरी ऑक्टोबरमध्ये तिथे सूर्यप्रकाशात आम्ही विक्रम लॅंडरचा शोध पुन्हा घेऊ”.

दरम्यान,नासाने म्हटले आहे की विक्रम लॅंडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून 600 किमी दूर पडल होत. 17 सप्टेंबरला नासाच्या लूनर रिकॉनसेंन्स ऑर्बिटरने(LRO) त्या भागात शोधमोहिम राबवली. मात्र तिथे सध्या अंधार असल्यामुळे फोटो घेऊ शकलो नाही. यामुळे विक्रम लॅंडरचा ठावठिकाणा मिळू शकला नसल्याचे नासाने स्पष्ट केले.

इस्त्रोचे चेअरमन डॉ. के. सिवन म्हणाले की विक्रम लॅंडरचा कोणताही ठावठिकाणी अद्याप लागू शकला नाही. मात्र चांद्रयान 2 चे ऑर्बिटर महत्वाचे काम करत असून चंद्राच्या चार बाजूंना फिरून ते सगळी माहिती पुरवत आहे, त्याची संपूर्ण यंत्रणा व्यवस्थित चालत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.