इस्राईलने सीमेवर हजारो सैनिक पाठवले : हिंसा थांबणार की युद्ध पेटणार?

जेरुसलेम : इस्राईलने उत्तर गाझा भागात शुक्रवारीही (14 मे) पहाटे जोरदार गोळीबार केला. दुसरीकडे जेरुसलेम वाचवल्याचा दावा करणाऱ्या हमास या मुस्लीम कट्टरतावादी संघटनेने इस्राईलवर लांब पल्ल्याच्या रॉकेट्सचा मारा केला.

त्याला प्रत्युत्तर देत इस्राईलने जोरदार हवाई हल्ले केले. इस्त्रायली सैन्याच्या या गोळीबार आणि हवाई हल्ल्यात गाझा परिसरात अनेक लोकांचा मृत्यू झाला. अनेक पॅलेस्टाईन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.

विशेष म्हणजे इस्राईलने आक्रमक पवित्रा घेतला आहे. इस्राईलने मुस्लीम कट्टरवादी संघटना हमास विरुद्ध लढा देण्याची घोषणा केलीय. त्याचाच भाग म्हणून इस्राईलने गाझा सीमेवर मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात केलेत. याशिवाय अतिरिक्त 9000 सैनिकांना देखील युद्धासाठी तयार रहायला सांगितलंय. पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी 1,800 रॉकेट फेकले आणि सैन्याने 600 हवाई हल्ले केले.

इस्राईलने युद्धासाठी दंड थोपटले आहेत. 14 मे रोजी इस्राईलने उत्तर गाझा भागात मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. याशिवाय मोठ्या प्रमाणात हवाई हल्लेही केले. या हल्ल्यानंतर या भागातील पॅलेस्टाईनचे नागरिकांना आपली मुलं आणि महत्त्वाचं सामान घेऊन हा परिसर आणि आपली घरं सोडावे लागले.

इस्राईलच्या हल्ल्यात गाझा परिसरात अनेक निरपराध लोकांचेही जीव गेले. एका ठिकाणी तर एकाच कुटुंबातील 6 जण घरातच मृत्यू पावले. इस्राईलने कट्टरतावादी संघटना हमाससोबत लढण्यासाठी गाझा सीमेवर मोठ्या संख्येने सैन्य पाठवले आहे. याव्यतिरिक्त, 9,000 सैनिकांना युद्धासाठी तयार राहण्यास सांगितले.

सध्या गाझा परिसर हमासच्या ताब्यात आहे. त्याचबरोबर इस्राईली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हे युद्ध सुरुच ठेवणार असल्याचं म्हटलंय. ते म्हणाले, आम्ही हमासला याची मोठी किंमत मोजायला लावू असं आधीच सांगितलं होतं. त्याप्रमाणेच आम्ही कारवाई करतोय. आम्हीही तेच करत आहोत.

हमास कट्टरतावादी संघटनेकडून जवळपास 1800 रॉकेट डागण्यात आलेत. याला प्रत्युत्तर म्हणून इस्राईली सैन्याने 600 हून अधिक हवाई हल्ले केले. त्यात गाझातील किमान 3 इमारती जमिनदोस्त झाल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्ध थांबवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, यानंतरही इस्राईल आणि हमास यांच्यात युद्ध सुरुच आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.