हमासकडून इस्रायलवर रॉकेट हल्ले

तेल अविव – हमासकडून आज इस्रायलच्या भूप्रदेशात दोन रॉकेट डागली. इस्रायलने केलेल्या रॉकेट हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हमासने ही रॉकेट सोडली, असे अल जजीरा या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

गाझा पट्टयातील उत्तरेकडच्या भागात हमासच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर इस्रायलच्या लढाऊ विमानांनी जोरदार बॉम्ब हल्ले केले असल्याचा दावा इस्रायलने केलेला आहे. त्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरासाठी हमासकडूनही रॉकेट सोडली गेली. या दोन्हीकडच्या रॉकेट हल्ल्यात किती जिवीतहानी झाली हे समजू शकले नाही. हमास आणि इस्रायलमध्ये इजिप्तच्या पुढाकारामुळे युद्धबंदी घडवून आणली गेली होती. मात्र या युद्धबंदीला 1 एप्रिलपासून सुरुवात झाली होती. पॅलेस्टाईन इस्रायली गेल्या वर्षी सैन्याच्याविरोधात गाझापट्टयात निदर्शने करायला सुरुवात केल्यापासून तणाव वाढला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.