इस्रायलच्या पंतप्रधानांचा ऐतिहासिक निर्णय; समलैंगिक व्यक्तीची मंत्रिपदावर नियुक्ती 

जेरुसलेम – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू यांनी जगासमोर एक अनोखा आदर्श ठेवला आहे. बेंजामीन नेत्यान्याहू यांनी आमिर ओहाना यांची कार्यकारी न्याय मंत्री  म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ओहाना यांनी पहिल्यांदाच समलैंगिक असल्याचे उघडपणे स्वीकार केले होते. त्यामुळे ओहाना देशाच्या इतिहासातील पहिले समलैंगिक मंत्री बनले आहेत.

नेत्यान्याहू यांच्या दक्षिणपंथी लिकुड पार्टीच्या वतीने ओहाना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ओहाना यांची नियुक्ती अशा वेळेस करण्यात आली तेव्हा इस्रायलमध्ये ‘गे प्राईड ‘साजरा केला जात होता. ओहाना यांची नियुक्ती करताना पंतप्रधान कार्यालयाने म्हंटले कि, आमिर ओहाना कायदा व्यवस्थेला उत्तम पद्धतीने ओळखणारे व्यक्ती आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.