इस्रायलच्या नागरिकांना सात देशांत जाण्यास बंदी

जेरूसलेम – परदेशातून इस्रायलमध्ये येणाऱ्या नागरिकांवर कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच भारतासह करोनाचा अतीव धोका असणाऱ्या सात देशांत प्रवास करण्यास इस्रायलने आपल्या नागरिकांना बंदी घातली आहे.

तेथील सरकारच्या निर्णयानुसार युक्रेन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत, मेक्‍सिको आणि टर्की या देशांचा या यादीत समावेश आहे. इस्रायल पंतप्रधान कार्यालय आणि आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या संयुक्‍त पत्रकातून यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. या नव्या नियमाची अंमलबजावणी 3 मेपासून करण्यात येणार आहे. 16 मेपर्यंत हे नियम लागू असतील. मुख्य म्हणजे, हा नियम फक्त इस्रायली नागरिकांसाठीच लागू असणार आहे. या देशाचे मूळ रहिवासी नसणाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे, त्यामुळे ही मंडळी या देशाचा प्रवास करू शकणार आहेत.

करोनाचा धोका अधिक असणाऱ्या, वर नमूद करण्यात आलेल्या देशांतून इस्रायलमध्ये परतणाऱ्यांसाठी दोन आठवड्यांचा क्वारंटाइन कालावधी अनिवार्य असेल. या व्यक्तींनी लस घेतलेली असेल तरीही त्यांना विलगीकरणाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.