मूळ इस्रायली वंशाची ऍक्ट्रेस गल गडोट सध्या तिच्या एका ट्विटमुळे वादात सापडली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन दरम्यानच्या संघर्षाबाबत तिने हे ट्विट केले होते. “माझा देश युद्धात सापडला आहे,’ असे तिने म्हटले आहे. तिने आपल्या शेजाऱ्यांचा म्हणजे पॅलेस्टाइनचा उल्लेखही केला आहे.
यावरून तिच्यावर टीका व्हायला लागली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील हमास या दहशतवाद्यांनी एकमेकांवर रॉकेट हल्ले सुरू केले आहेत. “माझा देश, माझे कुटुंब आणि माझ्या देशवासीयांची मला चिंता वाटते आहे. शांतता प्रस्थापनेसाठी नेत्यांनी पुढाकार घ्यावा,’ असे आवाहनही तिने केले आहे.
मात्र, इस्रायल शेजाऱ्यांमुळे युद्धात सापडलेला नसून इस्रायलनेच पॅलेस्टाइनवर युद्ध लादले आहे, असे संगीतकार जेम्स केनेडीने म्हटले आहे. गल गडोटला अभिनयाऐवजी राजकारणात इंटरेस्ट असल्याची टीकाही केनेडीने केली आहे. गल गडोटने हॉलीवूडमध्ये “वंडर वूमन’ची ऍक्शन हिरोईनची भूमिका साकारली होती.