प्रसिद्धी माध्यमांवर हल्ल्याचा इस्रायलचा इशारा

गाझा शहरातील अल जझिराची कार्यालये आणि इतर आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी माध्यमांच्या इमारतीत बॉम्ब हल्ला केला जाईल, असा इशारा इस्रायलने दिला आहे. इस्रायलच्या या इशाऱ्यामुळे गाझा पट्ट्यातील प्रमुख आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था आणि प्रसिद्धी माध्यमांमध्ये घबराट निर्माण झाली असून तेथील प्रतिनिधींनी कार्यालय सोडून पळ काढायला सुरुवात केली आहे. इस्राईलचे गुप्तचर अधिकारी आणि जाला इमारतीचे मालक अबू हुसम यांच्यामधील थेट फोन कॉलचे स्पीकरवरील थेट अल जझिराने प्रसारित केला. त्या फोनवरील संभाषणात इमारतीचे मालक इस्त्रायली अधिकाऱ्याला त्यांची उपकरणे इमारतीतून बाहेर काढण्यासाठी मीडियाला थोडा अवधी देण्याची विनंती करत आहेत. मात्र इस्रायलच्या अधिकाऱ्याने या विनंतीला स्पष्ट शब्दात नकार दिल्याचेही ऐकू आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.