“ऍरो-3′ क्षेपणास्त्राची इस्राईलकडून यशस्वी चाचणी

जेरुसलेम- इस्राईल आणि अमेरिकेने मिळून “ऍरो-3′ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. इराणकडून संभाव्य धोक्‍यांपासून रक्षण करण्यासाठी हे क्षेपणास्त्र बहुपयोगी ठरणार असल्याचे इस्राईलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी म्हटले आहे.

“ऍरो-3′ या क्षेपणास्त्र प्रणालीची चाचणी अमेरिकेत अलास्का येथे घेण्यात आली. अंतराळात निश्‍चित करण्यात आलेले लक्ष्य या क्षेपणास्त्राने अचूक वेधले, असे इस्राईलच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. ही चाचणी इस्राईलमध्ये होऊ शकली नसती. इराणकडून किंवा अन्यत्र कोठूनही इस्राईलविरोधातल्या संभाव्य क्षेपणास्त्र हल्ल्याला “ऍरो-3′ रोखू शकते, असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे.

जानेवारी महिन्यात इस्राईलने अमेरिकेबरोबर मिळून “ऍरो-3’ची चाचणी घेतली होती. मात्र तेंव्हा ही चाचणी इस्राईलमध्येच झाली होती. हे क्षेपणास्त्र अमेरिकेकडून इस्राईलला देण्यापूर्वीही अशाचप्रकारे चाचण्या घेण्यात आल्या होत्या. मात्र इस्राईलला आता या क्षेपणास्त्राची सुधारीत यंत्रणा देण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)