गाझा सिटी – इस्त्रायलने आज लागोपाठ दुसऱ्या दिवशी गाझापट्टीत तुफानी हवाई हल्ले केले. या हल्ल्यात आणि एकूणच संघर्षात आत्तापर्यंत किमान 24 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेच्या संघर्षात आणखी एक मोठी वाढ होण्याची भीती निर्माण झाली झाली आहे.
इस्त्रायलने पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद या अतिरेकी गटाच्या वरिष्ठ कमांडरला शुक्रवारच्या हल्ल्यात ठार मारले. आमच्यावरील संभाव्य हल्ले रोखण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती असे इस्त्रायलने म्हटले आहे. हे हल्ले होत असताना हमास या दहशतवादी संघटनेचा गट मात्र प्रति हल्ले करण्यापासून दूर राहिला आहे त्यामुळे हा संघर्ष सध्या तरी नियंत्रणात असल्याचे वाटत असले तरी लवकरच त्यात मोठा भडका उडण्याची शक्यता आहे.
इस्त्रायली सैन्याने सांगितले की पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी उडवलेल्या चुकीच्या रॉकेटमुळे उत्तर गाझामधील जबलिया शहरात शनिवारी उशिरा तीन लहान मुलांसह एकूण सहा नागरीक ठार झाले आहेत.
याआधी शनिवारी, इस्रायली युद्ध विमानांनी गाझा शहरातील चार निवासी इमारतींवर हल्ला केला, ही सर्व ठिकाणे इस्लामिक जिहादशी निगडीत आहेत. यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. प्रत्येक हल्ल्यांवेळी इस्रायली सैन्याने रहिवाशांना तेथून बाहेर पडण्याचाही इशारा दिला होता.