Israel Hamas War । इस्रायलने इराणवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत इस्रायलने हल्ला करत हमास प्रमुख इस्माईल हानियाला ठार केले. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने एका निवेदनात पुष्टी केली आहे की, तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानाला लक्ष्य केल्यावर हमास प्रमुख इस्माइल हानिया आणि त्यांच्या एका रक्षकाचा मृत्यू झाला.
हमास प्रमुख इस्माईल हानिया आणि त्याचा रक्षक ठार Israel Hamas War ।
एका वृत्तसंस्थेनुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने याची पुष्टी केली आहे. तेहरानमधील त्याच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यात हमासचा नेता इस्माईल हानिया आणि त्याचा रक्षक ठार झाल्याचे वृत्त आहे. आयआरजीसीने सांगितले की, “हा हल्ला बुधवारी सकाळी झाला आणि त्याची चौकशी सुरू आहे. यावर आयआरजीसीने दुःख व्यक्त केले आहे. हमासने हानियाच्या मृत्यूसाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे. इराणच्या नवीन राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी समारंभात हनियाची उपस्थिती आणि मंगळवारी इराणच्या सर्वोच्च नेत्याशी झालेल्या भेटीनंतर ही घटना घडली.
इस्रायलने 7 ऑक्टोबरचा घेतला बदला Israel Hamas War ।
तर दुसरीकडे इस्रायलने 7 ऑक्टोबरचा बदला म्हणून हमास प्रमुख इस्माईल हानियाची हत्या केली असल्याचे सांगण्यात येत आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये हमास प्रमुख इस्माईल हानिया यांची हत्या करण्यात आल्याचे खुद्द हमासने एक निवेदन जारी केले आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये इस्रायली सुरक्षा दलांनी गाझा पट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यात हानियाची तीन मुले आमिर, हाझेम आणि मोहम्मद यांना ठार केले होते. आयडीएफने म्हटले होते की, गाझा पट्टीतून इस्रायलविरुद्ध दहशतवादी कारवाया करण्यात हानियाच्या तीन मुलांचा सहभाग होता.