Israel-Hamas War। मागच्या १५ महिन्यांपासून सुरू असलेले इस्रायल आणि हमासदरम्यानचे युद्ध अखेर थांबण्यासाठी दोन्ही गटाकडून सहमती दर्शवण्यात आली आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी करार करण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती झाल्याचे वाटाघाटींची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला सांगितले.
मध्य पूर्वेतील ओलिसांच्या सुटकेबाबत एक करार Israel-Hamas War।
दीर्घकाळ चाललेल्या इस्रायल-हमास युद्धात एक नवीन वळण आले आहे आणि अखेर दोघांमध्ये युद्धबंदीवर सहमती झाली आहे. अमेरिकेचे पुन्हा राष्ट्राध्यक्ष होणार असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी ही युद्धबंदी दिसून आली. यावर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही एक मोठे विधान केले आहे. मध्य पूर्वेतील ओलिसांच्या सुटकेबाबत एक करार झाला आहे आणि त्यांना लवकरच सोडण्यात येईल ” अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. एका वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, त्यांनी असेही म्हटले की हा युद्धविराम करार केवळ नोव्हेंबरमधील आपल्या ऐतिहासिक विजयामुळेच होऊ शकला, कारण त्याने संपूर्ण जगाला संकेत दिला की माझे प्रशासन शांतता दाखवणारे आहे.
दरम्यान, अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, युद्धविरामासाठी सहा आठवड्यांची योजना आखण्यात आली आहे. त्यामध्ये इस्रायली फौजा गाझामधून टप्प्याटप्प्याने माघार घेतील आणि इस्रायलने ताब्यात घेतलेल्या पॅलेस्टिनी कच्च्या कैद्यांच्या बदल्यात हमासच्या ताब्यात असलेल्या ओलिसांची सुटका केली जाईल. हमासने ‘एका वृत्तसंस्थेला सांगितले की, त्यांच्या शिष्टमंडळाने वाटाघाटी करणाऱ्या मध्यस्थांकडे युद्धविराम करार आणि ओलिसांची सुटका याला मान्यता दिली आहे. त्यापूर्वी हमासने तोंडी मान्यता दिली होती असे पॅलेस्टाईनच्या अधिकाऱ्याने सांगितले. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गिडियन सार युरोपच्या दौऱ्यावर होते, आपण या करारासंबंधी बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी मायदेशी परत जात असल्याचे त्यांनी जाहीर केले.
इस्रायलवर युद्धादरम्यान १२०० नागरिकांचा मृत्यू Israel-Hamas War।
हमासने ७ ऑक्टोबर २०२३ मध्ये इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात १२०० नागरीक आणि सैनिकांची हत्या केली होती आणि २५० पेक्षा जास्त लोकांना ओलीस ठेवले होते. त्यानंतर इस्रायलने गाझामध्ये केलेल्या युद्धात ४६ हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनी ठार झाले. त्यामध्ये महिला आणि मुलांची संख्या जवळपास दोन-तृतियांश इतकी आहे.