तेल अवीव: जगभर पसरलेल्या करोनावर रामबाण उपाय ठरेल अशी लस शोधल्याचा दावा इस्रायलने केला आहे. अर्थात, असे असले तरी ही लस प्रत्यक्षात केव्हा येणार याबाबत मात्र, कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
येत्या दोन दिवसांत या लसीची मानवी चाचणी करण्यासाठी सरकारकडे परवानगी मागण्यात आली आहे. या चाचण्या सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार आहेत. इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्चने हा दावा केला आहे. या लसीच्या मानवी चाचणीसाठी सुरुवातीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
करोनावर नियंत्रण आणू शकेल अशी या लसीची क्षमता आहे. या लसीमुळे बाधित व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होण्याचे प्रमाण वाढते व त्यामुळे रुग्ण बरा होण्याचे प्रमाणही वाढते, असा दावा संस्थेतील संशोधकांनी केला आहे.
इस्रायलच्या डिफेन्स बायोलॉजिकल इन्स्टिट्यूटनेही काही दिवसांपूर्वी असाच दावा केला होता. मात्र, त्यांना सरकारने मानवी चाचणी करण्याची परवानगी अद्याप दिलेली नसल्याचेही सांगण्यात येत आहे.