जारुसलेम – हमासशी संबंध असलेल्या डझनभर पॅलेस्टाईनी विद्यार्थ्यांना वेसट बॅंक भागातून अटक करण्यात आली आहे, असे इस्रायलने म्हटले आहे. हे सर्व विद्यार्थी बिझरेत विद्यापिठाशी संबंधित आहेत आणि त्यांचा निधी हस्तांतरण, चिथावणी देणे आणि हमासच्या कारवाया घडवणे यासारख्या दहशतवादी कृत्यांमध्ये थेट सहभाग असल्याचेही इस्रायलने म्हटले आहे.
गाझामध्ये विशेष प्रभाव असलेल्या या दहशतवादी संघटनेच्यावतीने सशस्त्र दल, विद्यार्थी संघटना, राजकीय गट आणि स्वयंसेवी संघटनाही चालवली जाते. हमासने कित्येक वर्षांपासून इस्रायलविरोधात हल्ले केले असल्यामुळे इस्रायल आणि पाश्चात्य देशांकडून हमासला दहशतवादी संघटना म्हणूनच ओळखले जाते.