Ismail Hania । या वर्षी जुलैच्या अखेरीस तेहरानमध्ये हमास नेता इस्माइल हनियाची हत्या करण्यात आली होती. असा आरोप इराणने इस्रायलवर केला होता. मात्र याची जबाबदारी इस्रायलने घेतली नाही. परंत, आता या हत्येच्या तब्बल ५ महिन्यानंतर इस्रायलने हानियाच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारली आहे. यासाठी इस्रायलने कबुली दिली आहे.
इस्रायलचे संरक्षण मंत्री कॅट्झ यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे कबूल केले आहे. त्यांनी याविषयी बोलताना इस्रायलने हमासचा नेता इस्माईल हानियाची इराणमध्ये जुलैमध्ये हत्या केली होती” असे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या विधानामुळे तेहरान आणि इस्रायलमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काय म्हणाले इस्रायलचे परराष्ट्र मंत्री? Ismail Hania ।
इस्रायलचे संरक्षण मंत्री कॅटझ यांनी यासंदर्भात, ‘आजकाल जेव्हा हुथी दहशतवादी संघटना इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागत आहेत, तेव्हा मला माझ्या भाषणाच्या सुरुवातीला एक स्पष्ट संदेश द्यायचा आहे.आम्ही हमासला पराभूत केले, आम्ही इराणची संरक्षण यंत्रणा नष्ट केली आणि आम्ही सीरियामध्ये असाद शासनाचा पाडाव केला. आम्ही येमेनमधील हुथी दहशतवादी संघटनेलाही मोठा धक्का देऊ.” असे त्यांनी म्हटले .
त्यानंतर पुढे कॅटझ म्हणाले, ‘आम्ही त्यांच्या धोरणात्मक पायाभूत सुविधांचे नुकसान करू आणि आम्ही त्यांच्या नेत्यांचा शिरच्छेद करू – जसे आम्ही तेहरान, गाझा आणि लेबनॉनमधील हानिया, सिनवार आणि नसराल्लाहचा केला. होदेइदा आणि सना येथेही आम्ही असेच करू.” असे त्यांनी म्हटले.
इराण समर्थित हुथी गट येमेनमध्ये सक्रिय आहे. जे गेल्या वर्षभरापासून लाल समुद्रातील व्यावसायिक शिपिंगला लक्ष्य करत आहे आणि इस्रायलवर सागरी नाकेबंदी लादण्याचा प्रयत्न करत आहे.
हानियाची इराणमध्ये हत्या झाली होती Ismail Hania ।
या वर्षी जुलैच्या अखेरीस तेहरानमध्ये हमास नेता इस्माइल हनियाची हत्या करण्यात आली होती. असा आरोप इराणने इस्रायलवर केला होता. मात्र याची जबाबदारी इस्रायलने घेतली नाही. मात्र आता इस्रायलने त्याची जबाबदारी घेतली आहे. हनियानंतर हमासचे प्रमुख याह्या सिनवार यांनाही इस्रायलने ठार केले होते.