इस्लामपूर – देशात हॅन्डबॉलचा प्रचार आणि प्रसार झपाट्याने होत आहे. या स्पर्धेत चांगला खेळ करून जिंका, अशा शब्दात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. इस्लामपूर येथील 48 व्या पुरुष महाराष्ट्र राज्य हॅन्डबॉल अजिंक्य स्पर्धेचा शुभारंभ ना. पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी स्पर्धेतून राज्यसंघाची निवड केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
48व्या पुरुष महाराष्ट्र राज्य हॅन्डबॉल अजिंक्य स्पर्धा शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रतिक पाटील, राजवर्धन पाटील, प्रा. शामराव पाटील, ऍड. चिमण डांगे, उपनगराध्यक्ष दादासो पाटील, बाळासाहेब पाटील, खंडेराव जाधव, ऍड. धैर्यशील पाटील, संजय पाटील, आयुक्त सचिन सावंत, बशीर मुल्ला, सचिन कोळी, स्वरूप मोरे उपस्थित होते.
जयंत स्पोर्टस अकॅडमी व सांगली जिल्हा हॅन्डबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते राजारामबापू पाटील यांची जन्मशताब्दी व राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, मुंबई, अहमदनगर, बीड, नागपूर, औरंगाबाद, जळगांव, भंडारा, अकोला, परभणी, रायगड यासह संपूर्ण राज्यातील 23 संघांनी सहभाग नोंदविला आहे.
हॅन्डबॉल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विक्रम पाटील, जिल्हा सचिव प्रा. जहांगीर तांबोळी, राज्य सचिव प्रा. रणधीर सिंग, सहसचिव सुदेश मालप, आनंद चव्हाण, खजिनदार राजाराम राऊत प्रा. प्रवीण गावडे, रवी वाघमोडे, महेश करे, संग्राम ताटे, मुकुंद वाटेगांवकर, अकॅडमीचे प्रा. पंकज कोरे, अनिल पाटील, अमीर जमादार, दिग्विजय पाटील यांनी स्पर्धेचे संयोजन केले आहे.