पॅरिस – इस्लामिक स्टेटच्या एक म्होरक्या चकमकीत मारला गेला आहे. इस्लामिक स्टेटने मदतनिसांचा गट आणि अमेरिकेच्या सैनिकांच्या तुकडीवर हल्ला केल्याबद्दल करण्यात आलेल्या कारवाईमध्ये त्याला संपवण्यात आले. ग्रेटर सहारा या भागात ही चकमक झाली. या हल्ल्यात ठार झालेला म्होरक्या 1 क्रमांकाचा शत्रू होता आणि त्याचे नाव आदनान अबू वालिद अल साहरावी असे होते, असे फ्रेच अधिकाऱ्यांनी सांगितले.
फ्रान्सचे अध्यक्ष इम्रन्युएल म्रकॉ यांनी रात्री उशिरा साहरावी ठार झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. साहरावीने स्वतः 6 फ्रेच मदत कार्यकर्ते आणि त्यांच्या नायजेरियन सहकाऱ्यांच्या हत्येचे आदेश दिले होते. साहरावीच्याच गटाने 2017 साली अमेरिका आणि नायजेरियाच्या सैन्यावर हल्ला केला होता.
काही आठवड्यांपूर्वी बारखाने लष्कराच्या कारवाईत तो मारला गेला आहे. मात्र त्याची ओळख पटवणे महत्त्वाचे असल्याने ही घोषणा केली गेलेली नव्हती, असे फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी सांगितले. मात्र, साहरावीला ज्या चकमकीत मारला गेला त्या कारवाईचा कोणताही तपशील त्यांनी दिला नाही.