बगदाद – इस्लामिक स्टेट अर्थात इसिसचा म्होरक्या अबू हसन अल हशिमी अल कुरेशीचा मृत्यू झाल्याचे इसिसने जाहीर केले आहे. (Islamic State group announces death of leader Hashimi al-Qurashi) इसिसचा प्रवक्ता अबू ओमर अल मुजाहीर याने इसिसशी संबंधित प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना कुरेशी युद्धात मारला गेल्याचे सांगितले.
अल हशिमी कोठे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये मारला गेला, हे मात्र मुजाहीर याने सांगितले नाही. अल हाशिमी लढताना मारला गेला, एवढेच त्याने वृत्तवाहिनीला पाठवलेल्या ऑडिओ संदेशात सांगितले. अल हशिमीच्या जागेवर एक नवीन म्होरक्या नियुक्त करण्यात आला आहे. अबू अल हुसैन अल हुसैनी अल कुरेशी असे या नव्या म्होरक्याचे नाव आहे आणि त्याला या वर्षी मार्च महिन्यातच इसिसचा प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले, असल्याचे त्याने सांगितले.
इस्लामिक स्टेटची स्थापना झाल्यापासून अबू अल हुसैन अल हुसैनी हा या संघटनेचा तिसरा म्होरक्या आहे. इसिसच्या यापुर्वीच्या प्रमुखाने पकडले जाण्याच्या भीतीने या वर्षी फेब्रुवारीमध्ये स्वतःला स्फोटाने उडवून दिले होते.
उत्तर सीरियामध्ये इसिसचा संस्थापक अबू बकर अल बगदादीच्या अड्ड्यावर अमेरिकेच्या कमांडोंनी छापा घातला होता. त्या कारवाईमध्ये बगदादी मारला गेला होता. त्याच्या मृत्यूने सीरियात वर्षबर चाललेली कारवाई समाप्त झाली होती.
Russia Peace Plan : ‘झेलेन्सकी’कडून इलॉन मस्क यांची खरडपट्टी; म्हणाले “अगोदर युक्रेनला यावे आणि…”
बगदादीच्या मृत्यूनंतर इसिसचा प्रमुख म्हणून अबू इब्राहिम अल हशिमी अल कुरेशी याला नियुक्त करण्यात आले होते. अल कुरेशी हा सीरियातील इडलिब प्रांतात अमेरिकेच्या सैन्याच्या कारवाईत मारला गेला होता. सीरिया आणि इराकमध्ये 2017 मध्ये इसिसविरोधातली कारवाई समाप्त झाली. मात्र या संघटनेचे सदस्य अजूनही या दोन्ही देशांमध्ये घातपाती कारवाया करत असतात.