नवी दिल्ली : इंडियन सुपर लीगमध्ये बुधवारी ओडिशा एफसीने यजमान हैदराबादचा २-१ ने पराभव करत विजय संपादित केला. ओडिशाचा हा सलग चौथा विजय ठरला.
.@OdishaFC solidify their top 4⃣ hopes by doing a double over @HydFCOfficial 👏#HFCOFC #HeroISL #LetsFootball pic.twitter.com/yGY2Aks5v8
— Indian Super League (@IndSuperLeague) January 15, 2020
सामन्यात हैदराबादकडून मार्सिलिन्होने पहिल्या मिनिटातच गोल करत १-० ने आघाडी घेतली होती. पण ओडिशाच्या एरिडेन संतानाने १५ व्या मिनिटाला गोल करत संघास १-१ ने बरोबरी साधून दिली. त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याच्या ४५ व्या मिनिटाला संतानाने दुसरा गोल करत ओडिशाला २-१ ने आघाडीवर नेले. सामन्याच्या निर्धारित वेळेपर्यंत ही आघाडी कायम राहिल्याने हैदराबादला पराभवाला सामोरे जावं लागले.
ओडिशाचा यंदाच्या सत्रात १३ व्या सामन्यातील हा ६ वा विजय ठरला असून २१ गुणांसह ते गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहेत. दुसरीकडे हैदराबादचा १३ सामन्यातील हा १० वा तर सलग चौथा पराभव ठरला असून ते गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहेत.