ओडिशा : इंडियन सुपर लीगमध्ये शनिवारी ओडिशातील कलिंगा स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात ‘ओडिशा एफसी’ने ‘मुंबई सिटी एफसी’वर २-० ने विजय मिळवला. या विजयासह ओडिशाने गुणतालिकेत टाॅप-४ मध्ये स्थान मिळवले आहे.
.@MumbaiCityFC's 6⃣-match unbeaten away run comes to an end at the Kalinga Stadium 🚫#OFCMCFC #HeroISL #LetsFootball pic.twitter.com/9auP30a2eo
— Indian Super League (@IndSuperLeague) January 11, 2020
ओडिशाकडून रिडेन संताना याने पूर्वार्धात ४७ व्या मिनिटाला गोल करत आघाडीवर नेले होते. त्यानंतर उत्तरार्धात सिस्को हर्नांडेजने ७४ व्या मिनिटाला दुसरा व विजयी गोल केला. मुंबईला एकही गोल न करता आल्याने पराभव स्विकारावा लागला. या सत्रातील लीगमधला ओडिशाचा ५ वा विजय ठरला.
ओडिशाचा संघ १८ गुणांसह गुणातालिकेत चौथ्या स्थानी पोहचला आहे तर मुंबई एफसी सिटीचा हा लागोपाठ दुसरा पराभव ठरला. मुंबईचा संघ १६ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहचला आहे.