मुंबई : एटीके एफसीने शनिवारी यजमान मुंबई सिटी एफसीचा २-० ने पराभव करत इंडियन सुपर लीग फुटबाॅल स्पर्धेत गुणतालिकेत अव्वलस्थान पटकाविले आहे. एटीके एफसीकडून कर्णधार प्रणय हल्धरने सामन्याच्या २९ व्या मिनिटाला तर माइकल सूसाइराजने ४३ व्या मिनिटाला विजयी गोल केला.
.@MumbaiCityFC's 6⃣-match unbeaten run comes to an end at the hands of @ATKFC!#MCFCATK #HeroISL #LetsFootball pic.twitter.com/yjigb8F1fA
— Indian Super League (@IndSuperLeague) January 4, 2020
दोन्ही संघाचा हा ११ वा सामना होता. एटीके संघाने या स्पर्धेत ६ विजय, ३ ड्रा आणि २ पराभवासह २१ गुण प्राप्त करत १० संघाच्या गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. एफसी गोवा संघाचे सुध्दा २१ गुण आहेत पण गोलफरकामुळे ते दुस-या स्थानी आहेत.
मुंबई एफसीचा संघ या स्पर्धेत ४ विजय, ४ ड्रा आणि ३ पराभवामुळ १६ गुणासह गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. मुंबई आणि एटीके दरम्यान या सत्रातील हा दूसरा सामना होता. पहिल्या सामन्यात एटीकेने मुबंई संघास बरोबरीत रोखले होते.