#ISL : गोव्याचा हैदराबादवर १-० ने विजय

नवी दिल्ली : मनवीर सिंहने केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर रविवारी इंडियन सुपर लीगमध्ये गोवा एफसी संघाने हैदराबाद एफसी संघाचा १-० ने पराभव करत विजय संपादित केला. गोवा एफसी संघाचा या सत्रातील तिसरा विजय ठरला. या विजयासह गोव्याचा संघ लीगमध्ये गुणतालिकेत तिस-या स्थानावर पोहचला आहे.

सामन्यात पहिल्या सत्रात हैदराबाद गोव्यावर वरचढ राहिला. दोन्ही संघाना पहिल्या सत्रात गोल करण्यात अपयश आले. पण दुस-या सत्रात मनवीर सिंहने ६८ व्या मिनिटाला गोल करत गोव्यास १-० ने आघाडीवर नेलं. हा गोल सामन्याचा निर्णायक गोल ठरल्याने गोव्याचा हैदराबादवर १-० ने विजय झाला.

गोवा एफसी संघाच्या चिंगलेनसाना सिंह याला ‘प्लेयर आॅफ द मॅच’ने तर आशिष राय याला ‘इमर्जिंग प्लेयर’ म्हणून गौरविण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.