कोलकाता : रायॅ कृष्णाच्या शानदार हॅटट्रिकच्या जोरावर दोन वेळच्या विजेत्या एटीके संघाने शनिवारी ओडिशा एफसीचा ३-१ ने पराभव करत विजय नोंदविला. या विजयासह एटीके संघाने इंडियन सुपर लीग फुटबाॅल स्पर्धेत उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे.
📺 | @RoyKrishna21 spearheaded @ATKFC's commanding 3⃣-1⃣ win over @OdishaFC in Kolkata!
Here are all the goals from #ATKOFC 👇#HeroISL #LetsFootball pic.twitter.com/zLMLGqgyP8
— Indian Super League (@IndSuperLeague) February 8, 2020
कोलकाता येथील साॅल्ट लेक स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात पहिल्या सत्रात गोलशून्य बरोबरी होती. पण, त्यानंतर एटीकेने दुस-या सत्रात दमदार खेळ करत सलग चौथा विजय नोंदवत गुणतालिकेत अव्वलस्थान पटकाविले.
63' Hat-trick for @RoyKrishna21 ❤️
The @ATKFC forward is ripping the @OdishaFC defence apart with his precise finishing.
ATK 3-0 OFC#ATKOFC #HeroISL #LetsFootball pic.twitter.com/Ln0yqTJAlP
— Indian Super League (@IndSuperLeague) February 8, 2020
एटीके संघाकडून कृष्णाने ४९ व्या, ६० व्या आणि ६३ व्या मिनिटाला गोल करत आपली हॅटट्रिक पूर्ण केली. ओडिशा संघाकडून मैनुएल ओनूने ६७ व्या मिनिटाला एकमेव गोल केला.
A @RoyKrishna21 masterclass seals @ATKFC's place in the semi-finals 👌#ATKOFC #HeroISL #LetsFootball pic.twitter.com/Av91EOIq0M
— Indian Super League (@IndSuperLeague) February 8, 2020
या विजयासह एटीके संघाचे १६ सामन्यात ३३ गुण झाले अाहेत. एटीके आणि एफसी गोवा यांचे समान गुण असून गोलफरकामुळे एटीके अव्वलस्थानी आहेत. ओडिशा संघाचा हा सलग तिसरा पराभव आहे.