नवी दिल्ली : बेंगळुरू एफसीने इंडियन सुपर लीगमधील (#ISL) सामन्यात बुधवारी ओडिशा एफसीचा ३-० ने पराभव करत विजय संपादित केला. या विजयासह बेंगळुरू एफसीने गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले आहे.
A ruthless display of attacking football powers @bengalurufc to the 🔝 of the #HeroISL standings.#BFCOFC #LetsFootball pic.twitter.com/sXGEJZ5Yhv
— Indian Super League (@IndSuperLeague) January 22, 2020
कांतिरावा स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात बेंगळुरूकडून देशोर्न ब्राउनने २३ व्या मिनिटाला, राहुल भेकेने २५ व्या मिनिटाला आणि कर्णधार सुनील छेत्रीने ६१ व्या मिनिटाला पेनल्टीव्दारे गोल केला.
बेंगळुरू एफसी संघाचे १४ सामन्यात २५ गुण झाले असून ते गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहचले आहेत. तर ओडिशा एफसीचा संघ १४ सामन्यातील २१ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानी कायम आहे.